राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांचे गुरुवारी ४ जानेवारीते रात्री उपचारादरम्यान निधन झाले. ते ६८ वर्षाचे होते ..वर्षभरापासून अाजारी असलेल्या डावखरेंवर बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू हाेते. तिथेच रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी ५ जानेवारी ला दुपारी ३ वाजता त्यांच्यावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू, सर्वच पक्षांच्या नेत्यांशी उत्तम संबंध असलेला नेता अशी त्यांची अाेळख हाेती. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेवर निवडून जात. अनेक वर्षे त्यांनी उपसभापतिपदही भूषवले.मात्र २०१६ मधील पराभवानंतर डावखरे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूरच हाेते. त्यांचा पुत्र निरंजन डावखरे हे विधान परिषदेत राष्ट्रवादीचे अामदार अाहेत.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews